भाजपाच्यावतीने संग्रामपूर येथे घेण्यात आली नमो संवाद कॉर्नर सभा! खा. जाधवांच्या प्रचाराचे काम जोमाने करण्याचा निर्धार

 
Gdfn
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ संग्रामपूर शहरातील विविध भागात नमो संवाद कॉर्नर सभा घेण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष लोकेश राठी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात ही सभा घेण्यात आली.
  दरम्यान नमो संवाद कॉर्नर सभेत महायुतीचे उमेदवार  प्रतापराव जाधव यांना जास्तीत जास्त मतांनी कसे विजयी केलं जाईल या बद्दल नियोजन व चर्चा करण्यात आली.  याच प्रकारच्या जास्तीत जास्त सभा संग्रामपूर तालुक्यात घेण्यात येणार असून सर्व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकनिष्ठ खा.जाधव यांच्या प्रचाराचे काम करावे असे आवाहन लोकेश राठी यांनी केले. यावेळी तालुका प्रमुख केशव ढोकणे पाटील व सर्व घटकपक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते