भाजपाची चिखली तालुका कार्यकारिणी जाहीर! वाचा नव्या कार्यकारिणीत कुणाला मिळाली संधी...

 
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
भारतीय जनता पक्षाची चिखली तालुका नूतन कार्यकारिणी २५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली. तालुकाध्यक्ष सुनील पोफळे यांनी आ. श्वेताताई महाले व जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांच्या निर्देशानुसार या कार्यकारिणीमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. चिखली तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कलमधील युवा तसेच अनुभवी कार्यकर्त्यांचा या नवीन कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. कार्यकारिणीतील काही जुण्यांना नवीन जबाबदारी देण्यात येणार आहे.
Ks
चिखली तालुकाध्यक्ष सुनील पोफळे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत झालेल्या या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष पदावर गजानन पवार, रामेश्वर मोतीसिंग मोरे, सुनील पडघान, शंकर तायडे, अमोल परिहार, गजानन छबीले, अमोल ढोरे, गजानन सोळंकी, शिवानंद गायकवाड, शिवाजी सावळे, गजानन काळे, बबनराव गवई, शाहेद पटेल, गणेश भगत, गजानन शेळके, विष्णू घुबे त्यांची नियुक्ती करण्यात आली असून सरिचटणीस पदावर लक्ष्मण शेळके, विनोद सिताफळे, दत्तात्रय इंगळे व गजेंद्र म्हस्के यांची तर चिटणीस पदावर रितेश पवार, रामेश्वर सोळंकी, विकास मोरे, अनुराग भुतेकर, संजय पुरी, गजानन इंगळे, विलास इंगळे, मंगेश काटकर, गणेश रंगराव अंभोरे, नितीन पाटील, ज्ञानेश्वर पवार, विशाल नेमाने यांची नेमणूक केली आहे. या कार्यकारिणी कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी भारत म्हळसने तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून रमेश आकाळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे. 
  कार्यकारिणीत सदस्य म्हणून रवींद्र इंगळे, संजय खरात, प्रल्हाद भारोडकर, गुणवंतराव नारायणराव देशमुख, भारत सुरुशे, चैतन्य अंबादास घाडगे, श्रीहरी कचाले, रामेश्वर घाडगे, अंकुशराव वाघ, सर्जेराव सखाराम ठेंग, कैलास वायाळ, सतीश गावंडे, अनिल डुकरे, सिद्धेश्वर परिहार, गजानन परिहार, संदीप बाहेकर, विनोद अंभोरे, श्रीकृष्ण चौथे, अमोल भगवान सावळे, ज्ञानेश्वर प्रभाकर माने यांचा समावेश करण्यात आला आहे.