BIG NEWS सरनाईक, राजपुतांच्या आंदोलनाला मोदींचा पाठींबा!

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला सर्वच स्तरातून पाठींबा मिळत आहे.आता मोदींनी देखील या आंदोलनाला आपला पाठींबा असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे पाठिंब्याचे पत्र देखील मोदींनी पाठवले आहे.
  पीक विमा, भक्ती महामार्ग रद्द, विजेची समस्या, नुकसानभरपाई, कर्जमुक्ती यासह विविध मागण्यांसाठी विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत चिखली तहसील कार्यालय येथे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे.अधिकाऱ्यांकडून सरनाईक आणि राजपूत यांची मनधरणी करून आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात येत असली तरी आंदोलन कर्ते अद्यापही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. दरम्यान या आंदोलनाला आता शेतकरी व विविध वर्गातून पाठींबा मिळत आहे. आज ५ व्या दिवशी या आंदोलनाला मोदींनी पाठींबा दिला. चिखली येथील व्यवसायिक राजमल शंकरलाल मोदी यांनी सरनाईक आणि राजपूत यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शेतकरी हा आमचा मायबाप आहे, मायबाप शेतकरी जगला पाहिजे यासाठी भूमिका घेणाऱ्या सरनाईक आणि राजपूत यांच्या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे मोदी यांनी पत्रात म्हटले आहे.