मोठी बातमी!शेगावात एकवटले हजारो शेतकरी; रविकांत तुपकरांच्या नेतृत्वातील एल्गार रथयात्रेला थोड्याच वेळात होणार सुरुवात! पोलिसांचा तगडा बंदोबस्त

 
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी रविकांत तुपकरांसानी रणशिंग फुंकले आहे. आज,५ नोव्हेंबर पासून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वातील एल्गार रथयात्रेला संतनगरी शेगावातून सुरू होत आहे.
श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन ही रथयात्रा सुरू होणार आहे . थोड्याच वेळापूर्वी रविकांत तुपकर शेगावात दाखल झाले आहेत. काही वेळातच ही एल्गार रथयात्रा सुरू होईल. या यात्रेसाठी जिल्हाभरातून हजारो शेतकरी शेगावात दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शेगाव शहर, शेगाव ग्रामीण पोलिसांच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.