मोठी बातमी ! विजयराज शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील बैठक आटोपली; विजयराज शिंदेंनी घेतला "हा" निर्णय...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजप नेते तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांची आज नागपुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील , भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटे या बैठकीत उपस्थित होते. "आपण भरलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, युतीधर्माचे पालन करावे. महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करावा" अशा सूचना यावेळी बावनकुळे यांनी विजयराज शिंदेंना केला.

 Hcncmcयावेळी विजयराज शिंदे यांनी तक्रारींचा पाढा वाचला. याशिवाय गुलाबराव पाटील, आ.संजय गायकवाड यांच्याही विधानांची माहिती शिंदे यांनी बावनकुळेंना दिली. आपल्याला विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार करीत बुलडाणा लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद जास्त आहे,३ आमदार आहे. भाजपच्या पाठिंब्यावर मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी द्यावी अशी विनंती देखील शिंदेंनी बावनकुळे यांच्याकडे केली. मात्र बावनकुळे यांनी युतीधर्म महत्वाचा असून तुमच्या ज्यांच्याबद्दल तक्रारी आहेत त्यांना समज देऊ असा शब्द दिला. तब्बल १ तास ही बैठक चालली. या बैठकीतूनच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर शिंदे यांचे म्हणणे सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही शिंदे यांची फोनवरून चर्चा झाली. दरम्यान या संदर्भात उद्या बुलडाण्यात कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असे विजयराज शिंदे यांनी बुलडाणा लाइव्हशी बोलताना सांगितले.