मोठी बातमी! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीची आज पुण्यात बैठक; रविकांत तुपकर बैठकीला जाणार की नाही? कालपासून नॉट रिचेबल; कुठे आहेत रविकांत तुपकर? चर्चांना उधाण

 
rt

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना संघटनेच्या शिस्तपालन समिती समोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी आयोजित संघटनेच्या शिस्तपालन समितीची तसेच कोअर कमिटीची बैठक आज,८ ऑगस्टला  पुण्यात होणार आहे. पुण्यातील नवीन शासकीय विश्रामगृहावर सकाळी ११ वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. दरम्यान रविकांत तुपकर यांचा फोन कालपासून नॉट रिचेबल येत असल्याने तुपकर शिस्तपालन समितीसमोर हजर राहणार की नाही याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क वर्तवले जात आहेत.

 २ ऑगस्ट रोजी तुपकरांनी बुलडाण्यात कार्यकर्त्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत तुपकर यांनी कार्यकर्त्यांची मते ऐकून घेतल्यावर त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली होती. आपला केसाने गळा कापण्याचा प्रयत्न होत आहे, नेतृत्व दाबण्याचा प्रयत्न होत आहे,माझ्याऐवजी दुसरे कुणी असते तर आत्महत्या केली असती अशा शब्दात रविकांत तुपकर यांनी भावनांना मोकळी वाट करून दिली होती. या चळवळीसाठी आयुष्याची २० वर्षे दिली,त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आपली आहे. आता  महाराष्ट्रभर तरुणांची फौज उभी करणार, महाराष्ट्र पिंजून काढणार असेही रविकांत तुपकर म्हणाले होते.  त्यानंतर  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिस्तपालन समितीने रविकांत तुपकर यांना नोटीस पाठवली होती. तुपकर यांना शिस्तपालन समितीसमोर हजर राहण्याचे बजावण्यात आले होते. त्यामुळे आज होत असलेल्या बैठकीला रविकांत तुपकर हजर राहतात की नाही याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. तुपकर कालपासून नॉट रिचेबल असल्याने ते नेमके कुठे आहेत हे कळू शकले नाही.
[01:55, 08/08/2023] Krushna Sapkal BL: फोटो तुपकर