मोठी बातमी! सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे केंद्र आता सोमठाणा; रविकांत तुपकरांची न्यायालयाने केली सुटका;
Nov 25, 2023, 19:54 IST
रविकांत तुपकरांचे आता सोमठाणा गावात आजपासून अन्नत्याग आंदोलन; सोमठाणा गावाची निवड का? तुपकरांनी सांगितलं कारण! पहा व्हिडिओ...
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलिसांनी केलेली कारवाई आज सायंकाळी न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली. रविकांत तुपकर यांची सुटका करण्यात आली, त्यांच्यावर कोणत्याही अटी शर्ती लादलेल्या नसल्याची माहिती रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांनी दिली.दरम्यान आता रविकांत तुपकर यांनी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे..
आज दुपारी रविकांत तुपकर यांच्या घरी पोलीस दाखल झाले त्यावेळी तुपकर यांच्या फेसबुक पेजवर लाइव्ह दाखवण्यात येत होते. चिखली तालुक्यातील सोमठाणा गावातून तुपकरांना विद्या वाघमारे यांनी फोन करीत तुमच्या अटकेच्या निषेधार्थ आपण दोन मुलांसह आत्महत्या करीत असल्याचे सांगितले,त्यावेळी तुपकर यांनी विद्या वाघमारे यांची समजूत काढली. दरम्यान न्यायालयाने सुटका केल्यानंतर तुपकर आता सोमठाणा गावात पोहचून विद्या वाघमारे यांची भेट घेणार आहेत. सोयाबीन कापसाच्या प्रश्नासाठी आज रात्रीपासून रविकांत तुपकर सोमठाणा गावात अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहेत. उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू होईल असे रविकांत तुपकर म्हणाले...