मोठी बातमी! रविकांत तुपकर आज रात्री ९ वाजता फेसबुकवर LIVE येवून साधणार जनतेशी संवाद! निर्णायक राजकीय भूमिका घेणार?
Mar 19, 2024, 20:19 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर आज,१९ मार्चच्या रात्री ९ वाजता फेसबूकवर लाइव्ह येणार आहेत. त्यामाध्यमातून ते जनतेशी संवाद साधणार आहेत. लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असल्याने तुपकर आजच्या लाइव्ह च्या माध्यमातून कुठली मोठी राजकीय भूमिका जाहीर करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना जिल्हाभरात उदंड प्रतिसाद मिळत आहे. एक नोट एक व्होट अशा पद्धतीने लोकसभा निवडणूक लढणार असल्याने तुपकर यांनी जाहीर केले आहे. तुपकरांच्या निवडणूक प्रचारासाठी गावागावातून लोकवर्गणीचा ओघ सुरू झाला आहे. सध्यातरी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचे तुपकर यांनी जाहीर केले असले तरी राजकीय पक्षांची नजर देखील तुपकर यांच्यावर आहे. या पार्श्वभूमीवर आज रात्री ९ वाजता तुपकर त्यांच्या फेसबुक पेजवर जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे तुपकर नेमकी काय भूमिका घेतात? काही घोषणा करणार का याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत.