मोठी बातमी! रविकांत तुपकर यांना जामीन मंजुर! तुपकर म्हणाले, "सत्य परेशान हो सकता है, पराजित नही"! पुढचे आंदोलन महाराष्ट्राला हादरून सोडणारे असेल..

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना थोड्यावेळापूर्वी जिल्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. आता न्यायालयाचा निर्णय समोर आला असून तुपकर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲड. शर्वरी तुपकर यांनी तुपकर यांच्या बाजूने युक्तिवाद केला.

  रेल्वे रोको आंदोलन करण्यासाठी जात असताना तुपकर यांना काल राजूर घाटात अटक करण्यात आली होती. त्यानंतर रात्री त्यांना मेहकर पोलीस स्टेशन, तिथे तणाव झाल्यावर पुन्हा बुलडाणा पोलीस ठाण्यात आणले होते. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला.
तुपकर म्हणाले....
यायालयाबाहेर येताच तुपकर यांनी प्रसिध्दी माध्यमांशी संवाद साधला . यावेळी ते म्हणाले की, "सत्य परेशन हो सकता है लेकीन पराजित नही. पोलिसांनी केलेली अटक जोरजबरदस्ती होती. कितीही पोलीस केसेस झाल्या तरी आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू, आम्ही पुन्हा आंदोलन करू" असे तुपकर म्हणाले. मला मेहकर पोलीस स्टेशनला का नेले याचे उत्तर बुलडाणा पोलिसांनी द्यायला हवे. पोलिस कुणाच्या इशाऱ्यावर काम करतात असा सवाल तुपकर यांनी उपस्थित केला. आता आम्ही पुन्हा आंदोलन उभे करू, यापुढे होणारे आंदोलन महाराष्ट्राला हादरून सोडणारे असेल असे तुपकर म्हणाले. सध्या तुपकर शासकीय विश्रामगृहावर कार्यकर्त्यांची बैठक घेत आहेत..