मोठी बातमी! चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दाबून पण शांततेत मतदान! मतमोजणीला सुरुवात; थोड्याच वेळात निकाल येणार;

लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे खाते उघडले ३ - ० ने आघाडी

 
चिखली/ लोणार( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातल्या ५ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका आज ३० एप्रिल रोजी पार पडला. चिखली व लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदारांनी उत्साह दाखवला. चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ९६.१० टक्के मतदान झाले तर लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत देखील ९० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले.

मतमोजणीला ५ वाजेपासून प्रारंभ झाला असून काही तासांत निकाल हाती येणार आहेत. शेवटचे वृत्त सव्वा सहाला हाती आले तेव्हा लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने खाते उघडले. सध्या हमाल मापारी मतदारसंघातील १ आणि व्यापारी मतदारसंघातील २ अशा ३ जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडल्या आहेत. थोड्याच वेळात चिखली व लोणारचे उर्वरित निकाल हाती येणार असून ते बुलडाणा लाइव्ह च्या वाचकांना कळविण्यात येतील.