मोठी बातमी! खा.प्रतापराव जाधव विजयराज शिंदेंच्या भेटीला; नाराजी दुर करण्याचे प्रयत्न...

 
शेर
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भाजप नेते विजयराज शिंदे यांनी आज अखेर आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. विजयराज शिंदे यांच्या माघारीमुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. प्रतापराव जाधव यांचा मार्ग सुकर झाला आहे. शिंदे यांनी त्यांच्या सुचकांमार्फत उमेदवारी अर्ज मागे घेतला. दरम्यान थोड्यावेळापूर्वीच खासदार प्रतापराव जाधव विजयराज शिंदे यांची भेट घेण्यासाठी शिंदे यांच्या बुलडाणा शहरातील रामनगर येथील निवासस्थानी दाखल झाले आहेत. सध्या विजयराज शिंदे आणि प्रतापराव जाधव यांची चर्चा आहे. शिंदे यांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न खा.प्रतापराव जाधव यांच्याकडून होत आहे.