मोठी बातमी! आमदार संजय गायकवाडांच्या उमेदवारी अर्ज भरण्यावर खा.जाधवांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले एबी फॉर्म...

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार संजय गायकवाड यांनी आज बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडवला आहे. शिवसेनेत शिंदे गटाकडून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झालेली नसतानाच आ.संजय गायकवाड यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले असून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर बुलडाणा लाइव्ह ने खा.प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यांना एबी फॉर्म मिळाला असेल त्यामुळे अर्ज भरला असेल अशी उपहासात्मक टिप्पणी खा.जाधव यांनी केली.
 उद्या बुलडाण्यात महायुतीचा मेळावा आहे. त्याची तयारी सुरू आहे, त्यासंदर्भात माझे आ.गायकवाड यांच्याशी सकाळीच बोलणे झाले. मात्र अचानक त्यांनी अर्ज भरण्याचा निर्णय का घेतला हे माहीत नाही, त्यांच त्यांनाच विचारा असे खा.जाधव बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना म्हणाले..