BIG NEWS! माजी आमदार चैनसुख संचेतीच्या त्रासाला कंटाळून भाजप महिला नेत्याच्या पतीची आत्महत्या! रेल्वेसमोर उडी मारली; सुसाईड नोटमध्ये लिहिले, संचेतीमुळे....

 
Ghhf

अविनाश मनतकार हे तेल्हारा येथील वांगेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक होते. तेल्हारा येथे त्यांचा पेट्रोल पंप देखील होता. मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी मनतकार कुटुंबावर आरोप झाल्याने ते व्यथित होते. दरम्यान गुरुवारी मनतकार दांपत्य न्यायालयाच्या कामकाजाच्या निमित्ताने नागपुरात गेले होते. दुपारच्या सुमारास अविनाश मनतकार यांनी पत्नीजवळ शेगावला जायचं असे म्हटले. त्यानंतर थोड्याच वेळात येतो असे सांगून ते रिक्षाने कुठेतरी गेले. मात्र रात्र होऊनही  ते परतले नाहीत. त्यांचा मोबाईलही त्यांच्याजवळ नव्हता. त्यामुळे  नयना मनतकार यांनी त्यांचे पती अविनाश मनतकार बेपत्ता झाल्याची माहिती नातेवाईकांना दिली. सगळीकडून शोधाशोध सुरू झाल्यावर अविनाश मनतकार यांनी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याचे समोर आले.

    आत्महत्या करण्यापूर्वी मनतकार यांनी सुसाईड नोट लिहिल्याचे समोर आले आहे. यात त्यांनी मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य चैनसुख संचेती यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलकापूर अर्बन बँकेच्या भ्रष्टाचार प्रकरणात चैनसुख संचेती आणि बँकेचे उपाध्यक्ष लखाणी यांनी आम्हा पती-पत्नीला फसवल्याचा आरोप त्यांनी सुसाईड नोटमध्ये केलाय. यासोबतच या प्रकरणाचा तपास करणारे अकोला शहरातील रामदास पेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके यांनी आपल्याकडून ३८ लाख रुपये उकळले, मात्र आपल्याला मदत केली नाही असेही मनतकार यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. दरम्यान चैनसुख संचेती यांची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.