मोठी बातमी! तारीख पे तारीख...!निकालाची प्रतीक्षा वाढली! रविकांत तुपकरांच्या जामिनावर २१ फेब्रुवारीला होणार फैसला!

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या जामीनावर आता २१ फेब्रुवारीला सुनावणी होणार असल्याची बातमी आहे.
दिलेल्या तारखेनुसार तुपकर सकाळीच जिल्हा व सत्र न्यायालयात हजर झाले. न्यायाधीश श्री मेहर यांच्या न्याय दालनात दुपारपर्यंत जोरदार युक्तिवाद चालला. एडवोकेट शर्वरी तुपकर यांनी तुपकर यांच्या बाजूने युक्तिवाद केला.. आजचा युक्तिवाद संपुष्टात आल्यानंतर पुढे न्यायालयाने तूपकरांना २१ फेब्रुवारी हि तारीख दिली. त्यामुळे तुपकर समर्थकांना निकालाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.