BIG BREAKING रविकांत तुपकरांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढले; तुपकर म्हणाले...
Jul 22, 2024, 15:56 IST
पुणे(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आत्ताच एक मोठी ब्रेकिंग बातमी हाती आली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निष्काशित करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोअर कमिटीने पुण्यातील हॉटेल मथुरा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती दिली.
रविकांत तुपकर संघटनेच्या बैठकांना हजर राहत नाहीत, त्यांनी स्वतःचा वेगळा गट निर्माण केला आहे. त्यांची भूमिका पक्षविरोधी होती असा ठपका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोअर कमिटीने रविकांत तुपकर यांच्यावर ठेवला. आजपासून रविकांत तुपकर यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोणताही संबंध राहणार नाही असेही या कोअर कमिटीने सांगितले.
तुपकर म्हणाले...
दरम्यान या संदर्भात बुलडाणा लाइव्हने रविकांत तुपकर यांच्याशी संपर्क साधला असता. २२ वर्षे आपण शेतकऱ्यांसाठी लढलो, लाठ्या काठ्या खाल्ल्या..तुरुंगात गेलो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संघटना वाढवली. या कामाचे राजू शेट्टी हे फळ देतील अशी अपेक्षा नव्हती, हा दुर्दैवी दिवस आहे. यापुढेही आपण शेतकऱ्यांसाठी लढणार आहोत. २४ जुलै रोजी पुण्यात होणाऱ्या बैठकीत पुढील भूमिका स्पष्ट करू असे रविकांत तुपकर म्हणाले.