BIG BREAKING पीक विम्याच्या रकमेसाठी रविकांत तुपकर पुन्हा आक्रमक! कृषी अधीक्षक कार्यालयात मांडला ठिय्या; अधिकाऱ्यांना झाप झाप झापले

 
tupkar
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनात्मक पवित्रा घेणारे रविकांत तुपकर पीक विम्याचा मागणीसाठी पुन्हा आक्रमक झाले आहेत. ३१ मार्च पर्यंत नुकसान ग्रस्त सर्वच शेतकऱ्यांना पैसे मिळतील अशी घोषणा पीक विमा कंपनी व राज्य सरकारने केली होती. मात्र तारीख उलटून  बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत.
 

आज,१३ एप्रिलला रविकांत तुपकर शेकडो शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात धडकले. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात तुपकर व शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला आहे. कंपनी व सरकारने आमच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. तातडीने शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम देण्यात यावी असे म्हणत तूपकरांनी अधिकाऱ्यांना झापले. पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा तुपकर यांनी धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या हक्काचे पै पै घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका तूपकरांनी घेतली आहे.