BIG BREAKING पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ना.प्रतापराव जाधवांवर सोपवली "या" खात्याची जबाबदारी! उद्या घेणार पदभार...

 
Jxnx
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नरेंद्र मोदी यांनी काल, ९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलेले खा.प्रतापराव जाधव यांना राज्यमंत्री( स्वतंत्र प्रभार) म्हणून मंत्रीमंडळात संधी देण्यात आली. दरम्यान आज,१० जून रोजी केंद्रीय मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. ना.प्रतापराव जाधव यांच्याकडे आयुष ,आरोग्य आणि कुटुंब कल्याण या खात्याचा स्वतंत्र प्रभार असणार आहे. या खात्याची ध्येय धोरणे आणि धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार ना.प्रतापराव जाधव यांना असणार आहेत. ना. प्रतापराव जाधव उद्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.