BIG BREAKING "मी प्रतापराव गणपतराव जाधव ईश्वरसाक्ष शपथ घेतो की...." जिल्ह्याला आता लाल दिवा मिळणार? प्रतापराव जाधव यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागण्याची दाट शक्यता...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत खा. प्रतापराव जाधव यांनी दणक्यात विजय मिळवला. मतदानानंतर कुणी मशाल चालली, कुणी पाना चालला म्हणत होते मात्र प्रतापराव जाधव यांनी "शांतीत क्रांती" केली. आज मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्रतापराव जाधव यांनी जी आघाडी घेतली ती शेवटपर्यंत कायम ठेवली. विरोधी उमेदवारांना वरचढ होण्याची संधीच त्यांनी दिली नाही..प्रतापराव जाधव यांनी आता विजयाचा चौकार मारला आहे. केंद्रातही प्रचंड बहुमताने नसले तरी नरेंद्र मोदींच्याच नेतृत्वात सरकार स्थापन होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे, त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे सिनिअर लीडर या नात्याने खा.प्रतापराव जाधव यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अर्थात तशी शक्यता बुलडाणा लाइव्ह ने मतदानाच्या दिवशीच २६ एप्रिलला वर्तवली होती, ती खरी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच शपथविधी सोहळ्यात खा.प्रतापराव जाधव देखील मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.