BIG BREAKING रविकांत तुपकरांच्या घराभोवती तगडा पोलिस बंदोबस्त! कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Nov 25, 2023, 13:01 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढा उभारणाऱ्या रविकांत तुपकर यांच्या घराभोवती आज,२५ नोव्हेंबरला तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. रविकांत तुपकर यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
रविकांत तुपकर यांनी २९ नोव्हेंबरला मंत्रालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर कालच त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. दरम्यान आज त्यांच्या घराभोवती तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. कुठल्याही क्षणी रविकांत तुपकर यांना अटक होण्याची शक्यता आहे.