BIG BREAKING! जिल्ह्याच्या राजकारणातील मोठी बातमी! डॉ. राजेंद्र शिंगणेही अजितदादासोबत ! "या" कारणामुळे घेतला निर्णय! देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींचे केले कौतुक..

 
बुलडाणा( कृष्णा सपकाळ,गणेश धुंदळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सध्याचे राजकारण पाहून शेती करावीशी वाटते असे दोन दिवसांपूर्वी  म्हणणाऱ्या आमदार डॉ. शिंगणे यांनी     अखेर अजित पवार यांच्यासोबत जायचा निर्णय जवळपास घेतला आहे. जिल्हा बँकेच्या हितासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे डॉ.शिंगणे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलतांना म्हटले आहे. 
 

   
डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या या निर्णयामुळे जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी डॉ.शिंगणे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीला हजेरी लावली होती. आपण मोठ्या पवार साहेबासोबत असल्याचे ते म्हटले होते, त्यामुळे डॉ.शिंगणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे जिल्ह्यातील बहुतांश पदाधिकारी शरद पवारांनी आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित राहिले होते. मात्र आता नेत्याने निर्णय बदलल्याने कार्यकर्ते कोणता निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर सातत्याने आरोप करणारे खासदार प्रतापराव जाधव , आमदार संजय गायकवाड यावर काय प्रतिक्रिया देतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

 फडणवीस आणि गडकरींचे कौतुक! पृथ्वीराज चव्हाणांनी वाईट राजकारण केले..!

  शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेला उभारणी देण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाऊले उचलली असल्याचे डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले.  मात्र त्याआधीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वाईट पद्धतीचे राजकारण केले, जिल्हा बँकेला मदत केली नाही असेही ते म्हणाले. मी सुद्धा द्विधा मनःस्थितीत होतो मात्र अजितदादांनी  जिल्हा बँकेसाठी आणखी पाऊले उचलणार असल्याचा शब्द दिला, ते केवळ शब्द देत नाहीत तर करून दाखवतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या हितासाठी अजित दादांसोबत जायचा निर्णय डॉ.शिंगणे यांनी घेतला आहे.