किन्ही सवडत येथे १ कोटी ७४ लक्ष रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन! आमदार श्वेताताई म्हणाल्या, मोदी, शिंदे,फडणवीस यांच्याच काळात विकासाने वेग घेतला! काँग्रेसच्या नेत्यांनी स्वतःचा विकास करून घेतला...

 
yfyf
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत सुविधांचा विकास खेडेगावांमध्ये वेगाने झाला तरच भारताचा परिपूर्ण विकास होईल. काँग्रेस सरकारच्या काळात गावात विकास झालाच..जी काही थोडीफार कामे केली ती फक्त शहरात आणि त्याचा उद्देश मेवा खाणे हाच होता, त्यामुळे कामांचा दर्जा निकृष्ट होता. काँग्रेस नेत्यांनी स्वतःचा विकास साधून घेतला असा आरोप करीत मोदी , शिंदे, फडणवीस सरकारच्या काळातच सर्वांगीण विकासाने वेग घेतला असे प्रतिपादन चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी केले. चिखली विधानसभा मतदारसंघातील किन्ही सवडद येथे १ कोटी ७४ लक्ष रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी त्या बोलत होत्या.

notis

 काँग्रेसचे आतापर्यंत केवळ दुहीचे राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेतली. परंतु केंद्रात मोदी आणि राज्यात शिंदे, फडणवीस सरकार आल्यापासून विकास कामांनी वेग घेतल्याचे आ. श्वेताताई म्हणाल्या. राज्यातील शिंदे - फडणवीस सरकार विकासकामांसाठी मोठ्या निधीला मंजुरी देत असून त्याच निधीतून चिखली विधानसभा मतदारसंघात पायाभूत विकासाला गती मिळत असल्याचे आ. श्वेताताई म्हणाल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, चिखली भाजपा शहर अध्यक्ष पंडितराव देशमुख, बुलडाणा भाजपा तालुका अध्यक्ष सुनील देशमुख , जितेंद्र कलंत्री, संजय महाले, सुभाष झगडे, किन्ही सवडत येथील सरपंच आकाश बोंडे, उपसरपंच दुर्गाताई सवडतकर ,गजानन आराज यांची उपस्थिती होती.