Amazon Ad

आ. आकाश फुंडकर साहेबांचे लक्ष कुठे ? बोरी-अडगाव, शहापूर रस्त्याचे काम गेल्या दहा महिन्यापासून अपूर्णच! स्थानिक झाले बेहाल..

 

खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यातील बोरी-अडगाव,शहापूर रस्त्याचे काम गेल्या दहा महिन्यांपासून अपूर्णच असल्यामुळे स्वतः आमदारांनी लक्ष घालून हे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे. या रस्त्यामुळे स्थानिकांचे मोठे हाल होत असून आ. फुंडकर साहेबांचे लक्ष आहे तरी कुठे? असाही सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

बोरी-अडगाव, शहापूर रस्त्याचे काम गेल्या दहा महिन्यापासून अपूर्णच आहे .या रस्त्यावर फक्त गिट्टी टाकल्याने रस्त्याला ठिकठिकाणी गड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक वाहनांची तुटफुट या रस्त्यावर होत आहे. एवढेच नाही तर शहापूर,वाहाळा बोथा काजी या गावातून आंबेटाकळी,बोरी-अडगाव, येथून खामगाव येथे दररोज तीनशेहून अधिक विद्यार्थी या रस्त्याने शाळेत शिकण्यासाठी जात असतात.या विद्यार्थ्यांना सुद्धा दररोज या रस्त्याचा त्रास होत आहे. यारस्त्याने ऑटोने प्रवास करणाऱ्या वृद्धांना तर रस्त्याला पडलेल्या गड्ड्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो.
वाहनधारकांना सुद्धा गड्डे पडल्याने त्यांच्या वाहनाची तुटफूट या रस्त्याने होत असते. मात्र गेल्या दहा महिन्यांपासून संबंधित प्रशासनाने या रस्त्याची कुठलीही दुरुस्ती केलेली नाही, त्यामुळे स्थानिक आमदारांनी याकडे स्वतः लक्ष घालून या रस्त्याचे काम पूर्ण करावे. अशी मागणी या रस्त्याने प्रवास करणारे व शहापूर, वाहाळा , बोथकाजी येथील स्थानिक करीत आहेत. एकीकडे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक हैरान झाले असून आ. फुंडकर यांचे लक्ष कुठे आहे? असेही जनतेतून बोलल्या जात आहे.