अशोक चव्हाण यांच्या पक्षत्यागाने जिल्ह्यातील चाहत्यांना धक्का! जिल्हाध्यक्ष बोन्द्रे म्हणतात, यामुळे जिल्ह्यावर परिणाम नाही
आदर्श घोटाळ्या मुळे अशोक चव्हाण यांच्या स्वच्छ प्रतिमेला डाग लागला, तो अगदी 'एरियल, सर्फ एक्सेल' मुळे सुद्धा धुवून निघाला नाही. त्यामुळे आता ते शुद्धीकरण चा वसा घेतलेल्या भाजपच्या आश्रयाला गेलेत! आता ते चकाचक होऊन निघतील अशी प्रतिक्रिया बुलढाणा जिल्ह्यात उमटली आहे. युवा नेते, आमदार, विविध खात्यांचे मंत्री आणि मुख्यमंत्री असा राजकीय चढता आलेख अशोक चव्हाण यांचा राहिला आहे. याकाळात त्यांचे बुलढाणा जिल्हा व काँग्रेस वासीयांशी दीर्घ काळ सुमधुर संबंध राहिले . विधानसभा , लोकसभा निवडणूक, वा काँग्रेसचा मोठा कार्यक्रम असो वा अगदी खाजगी कार्यक्रम असो त्यांनी जिल्ह्याला वेळोवेळी भेट दिली. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत त्यांचे दीर्घकाळ ऋणानुबंध राहिले. ज्याला निष्ठावान नेत्यांचा आदर्श मानले त्या नेत्याने आपल्याला सर्व काही भरभरून देणारा पक्ष संकटात असताना त्याला सोडल्याने जिल्ह्यातील काँग्रेसच्या मंडळींना मोठा धक्का बसला आहे...