"बुलडाणा लाइव्ह" वर बातमी झळकताच बुधवतांनी बदलला कव्हर फोटो!

 
Gvdmbet
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आज,१९ मार्चच्या दुपारी बुलडाणा लाइव्ह ने "ये रिश्ता क्या कहलाता हैं" या मथळ्याखाली प्रकाशित केलेली बातमी तुफान व्हायरल झाली. जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात या बातमीची तुफान चर्चा झाली.अखेर शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी आपल्या फेसबुक खात्यावरील ते मुखपृष्ठ हटवले असून त्याजागी दुसरे मुखपृष्ठ अपलोड केले आहे.
उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांच्या फेसबुक खात्यावरील कव्हर फोटोवर अजूनही धनुष्यबाण आणि खा.प्रतापराव जाधव यांचे फोटो झळकत होते. त्यामुळे "ये रिश्ता क्या कहलाता हैं" अशी चर्चा होती. अखेर आता बुधवत यांनी तो कव्हर फोटो बदलून स्वतः भाषण करीत असल्याचा फोटो अपलोड केला आहे..