संतापजनक ! 'तु माझी इच्छा पूर्ण केली नाही' म्हणत कंडक्टर महिलेला केली शरीरसुखाची मागणी; परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा...

 
खामगाव
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) राज्य परिवहन मंडळाच्या लाईन चेकिंग अधिकाऱ्याने वाहक महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 विजय पवार असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. पिडीतेने २५ एप्रिलला याबाबत तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, खामगाव बस आगारात कार्यरत ३८ वर्षीय महिलेला महामंडळाचा लाईन चेकिंग अधिकारी विजय पवार हा त्रास देत होता. दरम्यान, २४ एप्रिल बुधवार रोजी पीडित महिला बस मध्ये पि. राजा येथे कर्तव्यावर गेली असता विजय पवार हा त्या ठिकाणी आला व बस चेकिंग साठी त्याने बस थांबविली. यावेळी वाईट उद्देशाने पीडीतेला बोलून म्हणाला की, 'तुला दोन-तीन वेळा बोलावले पण तू आली नाहीस, तू माझी इच्छा पूर्ण केली नाही' ते म्हणत त्याने शारीरिक सुखाची मागणी केली. तसेच 'तुला एखाद्या प्रकरणात चांगला फसवतो' अशी धमकीही त्याने पिडीतेला दिली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी विजय पवार विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पीएसआय किशोर बर्वे हे करत आहेत.