अन् जिल्ह्यात ज्यांच्या नावाची चर्चा, त्या संदीप शेळकेंचा केंद्रीय मंत्री रावसाहेब दांनवेनी केला सन्मान! म्हणाले, तुम्हाला लोकांचे आशीर्वाद मिळतील..! कारण आहे खास...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुका अजून वर्षभरावर असल्या तरी विविध राजकीय पक्षांच्या वतीने उमेदवारांची चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा माहौल तयार व्हायला सुरुवात झाली आहे. नागरिकांमध्ये सुद्धा संभाव्य उमेदवार म्हणून विविध नावांची चर्चा आहे, त्यात राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांचेही नाव आघाडीवर आहे. स्वतः संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणुक लढवण्याच्या विषयावर आतापर्यंत भाष्य केले नसले तरी त्यांचा जिल्ह्यातील सामाजिक, सहकार क्षेत्रातील वावर, समाजउपयोगी काम पाहता त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात यावे असा सूर त्यांच्या समर्थकांकडून पुढे येत आहे. तर मुद्दा असा आहे की, संदीप शेळके यांचा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय, स्वतः रावसाहेब दांनवेंनी संदीप शेळकेंचा सन्मान केल्याचा तो फोटो आहे. विशेष म्हणजे, रावसाहेब दानवे यांच्याकडे बुलडाणा लोकसभेसाठी भाजपने प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवलेली आहे, त्यामुळे फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावणे स्वाभाविक आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा नुकताच वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने माहोरा येथे संदीप शेळकेंनी ना. दांवेनेंची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. १३ मार्चला संदीप शेळके यांचाही वाढदिवस होऊन गेला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान पंधरवड्यात तब्बल ३ हजार बॉटल रक्तसंकलन झाले होते. याची माहिती रावसाहेब दानवेंना होती. त्यामुळे स्वतः ना. दानवे यांनी मोठा पुष्पहार घालून संदीप शेळकेंचा सन्मान केला. रक्ताची खूप गरज आहे, तुम्ही चांगले काम करीत आहात. तुम्हाला लोकांचे आशीर्वाद मिळतीलच असे म्हणत ना. रावसाहेब दानवेंनी राजर्षी शाहू परिवाराचे कौतुक केले.