शेतकऱ्यांची फौज बुलडाण्यात! थोड्याच वेळात रविकांत तुपकर दाखल करणार उमेदवारी अर्ज

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर आज,२ एप्रिलच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरणार आहेत. जिल्हाभरातील गावगाड्यातील शेतकऱ्यांची फौज घरची शिदोरी घेऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुलडाणा शहरात दाखल झाली आहे. बुलडाण्यात आतापर्यंत निघालेल्या सर्वच राजकीय कार्यक्रमांच्या गर्दीचा विक्रम आज मोडीत निघणार असल्याचे चित्र आहे.
    जिजामाता प्रेक्षागार मैदानाशेजारी असलेल्या टिळक नाट्य क्रीडा मैदानात होत असलेल्या निर्धार सभेला संबोधित केल्यानंतर भव्य रॅली बुलडाणा शहरात निघणार आहे. रॅलीचा समारोप झाल्यावर रविकांत तुपकर उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.