आंबेडकरी चळवळीतील नेते संजय वाकोडेंचा संदीप शेळकेंना पाठींबा! म्हणाले, संदिपदादा कामाचा माणूस, त्यांच्या पाठीशी उभे रहा...

 
Vhgv
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) आंबेडकर चळवळीतील नेते संजय वाकोडे यांनी अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मोठ्या ताकदीनिशी  संदीप शेळके यांच्या पाठीशी उभे  राहण्याचे आवाहन त्यांनी समाजबांधवांना केले आहे.

अपक्ष उमेदवार तथा वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांना विविध संघटनेकडून पाठिंबा मिळाल्याने त्यांची ताकद वाढली आहे. विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवत असल्याने  सामान्य जनतेचा देखील मोठा प्रतिसाद त्यांना मिळाला आहे. आंबेडकरी चळवळीतील नेते संजय वाकोडे यांनी पाठिंबा जाहीर करताच समाज बांधवांना आवाहन केले. ते म्हणाले की, संदीप शेळके कामाचे आहेत. विकासाचे व्हिजन असलेले सक्षम नेतृत्व आहे, जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासाठी त्यांनी प्रतिज्ञा घेतली आहे. त्यामुळे शेळके यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.