विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली अवकाळीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी! म्हणाले, सरकारने तोंडाला पाने पुसू नये..

 
Chuu
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात गेल्या दिवसात अवकाळी पाऊस व गारपीटीने धुमाकूळ घातल्याने जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यातच चितोडा, हिंगणा, कारेगाव, निळेगाव या गावात कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. मात्र अद्यापही सरकारकडून फक्त घोषणा दिल्या जात आहेत. अद्याप कोणत्याही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. काल, १५ एप्रिल रोजी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी विधान परिषद विरोध पक्षनेते अंबादास दानवे खामगावात तालुक्यातील चितोडा येथे पोहचले. वीज पडून मृत पावलेला शेतकरी सुरेश कवळे यांच्या कुटुंबाला त्यांनी भेट दिली.

अवकाळी पावसाने व गारपीटीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू असा शब्द यावेळी दानवे यांनी शेतकऱ्यांना दिला. मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू आहे,किमान आतातरी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नयेत असे यावेळी दानवे माध्यमांशी बोलताना म्हणाले. यावेळी ठाकरे गटाचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख  नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हा प्रमुख वसंतराव भोजने, जिल्हा प्रवक्ते गजानन धांडे, खामगाव विधानसभा संघटक रवि महाले , तालुकाप्रमुख विजय बोदड़े शहर प्रमुख विजय इंगळे,  सूरज बेलोकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सोबत होते.