अजितदादा उपमुख्यमंत्री झाले, छगन भुजबळ मंत्री झाले! चिखलीत शिवसेना आणि समता परिषदेचा फटाके फोडून जल्लोष...

 
Hxhx
चिखली(गणेश धुंदळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याच्या राजकारणात आज मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून आता ते एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात काम पाहणार आहेत. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनीदेखील यांनी देखील मंत्री म्हणून शपथ घेतली. या निर्णयाचे चिखलीत सत्ताधारी शिवसेना तसेच समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोषात स्वागत केले.
चिखली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर शिवसेना आणि समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते तथा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्ता खरात, उपजिल्हाप्रमुख शिवाजी देशमुख, तालुका प्रमुख गजानन मोरे, शहरप्रमुख विलास घोलप, राम देशमुख, वसंतराव गाडेकर, गोपी लहाने, राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर खरात, योगेश राजे, सतीश काळे, विजय खरात, साहेबराव अंभोरे, विनोद वनारे, शैलश गाढवे, शुभम खरात, संकेत खरात, आकाश खरात, दिपक मगर यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व समता परिषदेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.