बुलढाणा लोकसभेच्या रिंगणात एमआयएम ची एन्ट्री ? उमेदवाराची घोषणा लवकरच!

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलडाणा लोकसभेच्या मैदानात आता ऑल इंडिया मजलीस- ए- इत्तेहाद- उल - मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने उडी घेतली आहे. यासंदर्भात पक्षाची आढावा बैठक झाली असून लवकरच उमेदवार स्पष्ट होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ. मोबीन खान यांनी दिली. आज बुधवार, २७ मार्चला आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
  उमेदवार कोण ? या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, आम्ही यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना अहवाल पाठविला आहे. त्यामध्ये तिघांच्या नावाचा उल्लेख आहे, त्यापैकी एक दलीत समाजाचे उच्च शिक्षित व्यक्ती आहे. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. शिवाय जिल्ह्याचे अध्यक्ष घाटावरील डॉ. मोबीन खान, घाटाखालील दानिश शेख यांच्या सुद्धा नावाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. वरिष्ठांचा निर्णय आल्यावर आम्ही लवकरच उमेदवार घोषित करू असेही त्यांनी सांगितले. यावेळी एम.आय.एम पक्षातील जिल्हाभरातील पदाधिकारी उपस्थित होते.