कृषीमंत्री अब्दुल सत्तार खामगावात! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी; अधिकाऱ्यांना म्हणाले...

 
sattar
खामगाव( भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. काल, ९ एप्रिलच्या रात्री जिल्ह्याच्या बहुतांश भागात वादळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आज,१० एप्रिलला कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन पाहणी केली.

खामगाव तालुक्यातील चितोडा(अंबिकापूर) येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली. खासदार प्रतापराव जाधव यावेळी त्यांच्यासोबत होते. काल रात्री झालेल्या वादळी पावसाने कांद्याच्या पिकासह गहू मका भाजीपाला व आंब्याचे मोठे नुकसान झाले. तातडीने पंचनामे करा, लवकरात लवकर अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करा असे आदेश यावेळी सत्तार यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. राज्य सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल असा शब्द यावेळी मंत्री सत्तार यांनी दिला.