"बुलडाणा लाइव्हच्या" त्या बातमीनंतर आमदार संजय गायकवाड समर्थकांची सोशल मीडियावर पुन्हा धूम! "राजतीलक की करो तैयारी" व्हायरल..! पहा व्हिडिओ....

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडा lणा विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आक्रमक आमदार संजय गायकवाड म्हणजे वाद, वादंग, वॉर ( शुद्ध भाषेत सांगायचे झाल्यास राडा) असे समीकरणच झालंय! त्यामुळे सोशल मीडियावर जवळपास रोज व्यापणारा चेहरा म्हणजे भाऊ आहे. कालपासून ते सोशल मीडियावर पुन्हा गाजतआहेत. तिढा निर्माण झालेल्या बुलडाणा लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचा उमेदवार खासदार प्रतापराव जाधव बदलणार आणि आमदार धर्मवीर गायकवाड यांना दिल्ली चे तिकीट मिळण्याची शक्यता अशी बातमी बुलडाणा लाइव्ह ने प्रसिद्धी केली. अन अख्खा दिवस या ब्रेकिंग ची चर्चा वेगाने झाली. याचा वेग अजूनही कायम असताना काल दुपारनंतर धर्मवीर समर्थकांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला. आणि तो वेगाने व्हायरल झाला आणि होत आहे.
त्यांच्यावरील एका व्हिडीओ मुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काल दुपारपासून त्यांची दृश्य फित 'सोशल मीडिया'वर वेगाने सार्वत्रिक होत आहे.यामध्ये आमदार संजय गायकवाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुष्पगुच्छ ( बुके) देताना दिसत आहे. वरील बाजूला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे आहेत. मात्र यावेळी बॅकग्राऊंडला वाजणारे गीत सूचक आहेत. त्यात आ रहे है 'भगवाधारी', राजतीलक की करो तयारी यासह आणखी दोन ओळी आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी बदलण्याच्या व आमदार गायकवाड यांना संधी मिळण्याची बातमी प्रकाशित झाल्यावर आमदार समर्थकांनी हा 'व्हिडीओ' समाज माध्यमावर टाकला आहे. त्यामुळे तो तुफान वेगाने सार्वत्रिक होत आहे.