आमदार संजय गायकवाडांच्या भेटीनंतर खा.प्रतापराव जाधव म्हणाले, आमदार गायकवाडांना उमेदवारी भेटली तर...

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार संजय गायकवाड यांनी आज लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरून एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर खा.प्रतापराव जाधव यांनी आमदार संजय गायकवाड यांची भेट झाली. या भेटीनंतर देखील आ.गायकवाड लढण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. दरम्यान आ.गायकवाड यांच्या भेटीनंतर खा.प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशात लोकशाही आहे, लोकशाहीत उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे असे खा.जाधव म्हणाले.
 आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याचे सुरू झाले,असे अनेक अर्ज रोज भरल्या जातील. कुणी अपेक्षा ठेवण चुकीचं आहे का? असे खा.जाधव म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या दोघांचे नेते आहेत , त्यामुळे ते जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल असेही खा.जाधव म्हणाले. उमेदवारी मागणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, ही लोकशाही आहे. शेवटी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे खा.जाधव म्हणाले. आमदार संजय गायकवाड यांना उमेदवारी मिळाली तर मी १०० टक्के त्यांच्यासाठी काम करेल असेही खा.जाधव म्हणाले.विशेष म्हणजे खा. जाधव माध्यमांशी बोलत असताना आ. गायकवाड त्यांच्या बाजूलाच बसले होते..