अॅड .शर्वरी तुपकरांचा मोताळा तालुक्यात झंझावाती दौरा! म्हणाल्या, तुमच्यासाठी लढणाऱ्या,तुरुंगात जाणाऱ्या, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या झेलणाऱ्या रविकांत तुपकरांना साथ देण्याची हीच ती वेळ...
Mar 17, 2024, 11:13 IST
मोताळा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): रविकांत तुपकर गेल्या २१ वर्षांपासून शेतकरी,कष्टकरी,तरुण व सर्व सामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावरची लढाई लढत आहे. या लढाईत त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास भोगला, तडीपार भोगली, पोलिसांच्या लाठ्याकाठ्या झेलल्या... आपल्या जीवाची बाजी लावून लढणाऱ्या रविकांत तुपकरांना साथ देण्याची वेळ खऱ्या अर्थाने आली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकरांना साथ देवून परिवर्तन घडावा, असे आवाहन अॅड.शर्वरी रविकांत तुपकर यांनी मोताळा तालुका दौऱ्यादरम्यान बोलतांना केले आहे.
निर्धार यात्रेच्या निमित्ताने अॅड.शर्वरी रविकांत तुपकर यांचा १४ व १५ मार्च रोजी मोताळा तालुक्यात झंझावाती दौरा पार पडला. निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने रविकांत तुपकर जिल्हाभर फिरत आहेत तर दुसरीकडे त्यांच्या अर्धांगिनी अॅड.शर्वरी रविकांत तुपकर यादेखील गावोगावी फिरून जनसामान्यांची संवाद साधत आहेत. १४ मार्च रोजी मोताळा तालुक्यातील मूर्ती, वारूळी-नेहरूनगर, बोराखेडी, अंत्री, वडगाव, फर्दापूर, काबरखेड, धोनखेड, सारोळा पीर, खरबडी, वरुड, आडविहीर, जयपूर व १५ मार्च निपाणा, माळेगाव, चिंचखेड, दहिगाव, उऱ्हा, आव्हा, कोल्ही गवळी, पोफळी, वाडी, रिधोरा खंडोपंत, गुगळी, कोल्ही गोल्हर व पिंप्री गवळी या गावांचा झंझावाती दौरा करत सभा व बैठका घेतल्या. त्यांच्या या दौऱ्याला गावकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना अॅड.शर्वरी तुपकर यांनी सांगितले की, शेतकरी,कष्टकरी, तरुण व सर्व सामान्य नागरिकांच्या आग्रहास्तव लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय रविकांत तुपकरांनी घेतला आहे. त्यानंतर या लढ्यात गावगाड्यातील शेतकरी, कष्टकरी, तरुण, महिला व शहरी वस्तीतील सर्वसामान्य नागरिक, तरुण उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन पाठीशी उभे राहिले आहेत. त्यामुळे हा लढा आता एकट्या रविकांत तुपकरांचा नसून शेतकरी, कष्टकरी, तरुण, महिला व सर्वसामान्य जनतेचा झाला आहे. हे जनतेच्या मिळणाऱ्या पाठिंब्यातून सिद्ध झाले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने बुलढाणा जिल्हा पिंजून काढत असतांना परिवर्तनाची एक लाट निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आपला विचार लोकांपर्यंत पोहोचत आहे, त्यांना रुचत आहे आणि ते परिवर्तनाचा निर्धार करत आहेत, हेच या यात्रेचे यश आहे,अशा भावना यावेळी अॅड. शर्वरी तुपकर यांनी व्यक्त केल्या. तसेच आपल्या जीवाची बाजी लावून लढणाऱ्या रविकांत तुपकरांना साथ देण्याची वेळ खऱ्या अर्थाने आली आहे. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत रविकांत तुपकरांना साथ देवून परिवर्तन घडावा, असे आवाहन देखील अॅड.शर्वरी रविकांत तुपकर यांनी मोताळा तालुका दौऱ्यादरम्यान बोलतांना केले आहे.
८०% गावात जावून पदाधिकाऱ्यांनी पोहचवला आजवरचा संघर्ष...
चिखली येथे ०५ मार्च रोजी झालेल्या बैठकीत रविकांत तुपकरांनी निर्धार परिवर्तन अभियानाची घोषणा केली होती. ०७ मार्च पासून या अभियानाला जोरदार सुरवात झाली, त्यानंतर आज पर्यंत रविकांत तुपकरांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थकांनी बुलढाणा लोकसभा मतदातसंघातील ८०% पेक्षा जास्त गावात जावून नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या त्याचबरोबर रविकांत तुपकरांनी आजवर जनतेसाठी केलेल्या कार्याचा आढावा त्यांच्यासमोर मांडल्या. रविकांत तुपकरांच्या या परिवर्तन अभियानाला गावागावात तुफान प्रतिसाद मिळाला, यानिमित्ताने रविकांत तुपकरांची एक लाट निर्माण झाल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे.