आमदार गायकवाडांकडे गेलेल्या कार्यकर्त्याची 'स्वाभिमानी'त घरवापसी! वर्षभराच्या आतच काडीमोड; रविकांत तुपकरांनी बिल्ला लावून संघटनेत केले स्वागत...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेख रफिक शेख करीम यांनी काही महिन्याआधी  आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता.  परंतु अल्पावधीतच काडीमोड घेत त्यांनी  रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात  पुन्हा 'स्वाभिमानी'त प्रवेश घेतला आहे.
 

रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बुलडाणा शहरातील एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून रफिक कुरेशी यांनी आपली ओळख निर्माण केली होती. २०२१ ला रविकांत तुपकर यांनी सोयाबीन कापसाच्या भाववाढीसाठी अन्नत्याग सुरू केला तेव्हा शेख करीम यांनी डिझेल अंगावर ओतून घेत जीव धोक्यात टाकला होता. परंतु काही महिन्यांपूर्वी शेख रफिक शेख करीम यांनी आमदार गायकवाड यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. शेतकरी चळवळीतील हा कार्यकर्ता अल्पावधीतच मूळ संघटनेत परतला आहे. १४ डिसेंबर रोजी त्यांनी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पुन्हा प्रवेश करून आपली घरवापसी केली. रविकांत तुपकर यांनी शेख रफिक शेख करीम यांचे संघटनेत स्वागत केले. शेख रफिक शेख करीम हे मूळ शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते आहे. त्यांचा आंदोलनाचा पिंड आहे, त्यांची घरवापशी  संघटनेला अधिक बळ देणारी ठरेल, असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी यावेळी केले.
   याप्रसंगी राज शेख, अमोल मोरे, राहुल शेलार, संदीप मुळे, पवन काकडे, मोहीन खान, तौफिक खान, रशीद लाला, कदीर शेख, कासम शहा, अजगर शहा, विजय जेऊघाले, संजय खारे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.