आला रे आला गोविंदा आला...गोविंदाच्या रोड शो ने चिखली शहर दणाणले! रस्तेही गर्दीने फुलले! खा.प्रतापराव जाधवांच्या प्रचारार्थ पार पडला रोड शो ..

 
Bbbv
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर वाजणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर आधारित गीत, चाहत्यांनी फुललेले रस्ते,  ट्रॅफिक जाम आणि गोविंदाची एक झलक पाहण्यासाठी जमलेले हजारो युवक अश्या थाटात आणि दिमाखात चिखली नगरीत आज सिने अभिनेता गोविंदा यांचा रोड शो पार पडला. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आज सोमवारी संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत हा रोड पार पडला. यावेळी गोविंदा समवेत खासदार जाधव, मंत्री अब्दुल सत्तार,आमदार श्वेताताई महाले, उपस्थित होते.

आज संध्याकाळी जयस्तंभ चौक येथून रोड शो ला प्रारंभ झाला. मार्गावरील महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय, हिंदुसूर्य  महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालून गोविंदा व खासदार जाधव यांनी अभिवादन केले. यानंतर पुढे बाबूलाल चौक मार्गे मार्गक्रमण करणाऱ्या या शो ची सांगता चिखलीचे ग्राम दैवत रेणुका मातेच्या मंदिर परिसरात झाली.

आमदार श्वेताताईंनाही 
सेल्फीचा मोह ..

दरम्यान पुतळ्याजवळ खाली उतरल्यावर अनेक युवकांनी गोविंद सोबत सेल्फी घेतला. दरम्यान प्रचार रथात आमदार श्वेताताई महाले यांनीही गोविंदा सोबत सेल्फी घेतला.