आदित्य ठाकरे, रोहित पवार, नाना पटोले, अंबादास दानवे आज बुलडाण्यात! नरेंद्र खेडेकर दाखल करणार उमेदवारी अर्ज

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज,४ एप्रिलला बुलडाण्यात नेत्यांची मांदियाळी जमणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यासाठी त्यांनी जंगी शक्तीप्रदर्शनाचे नियोजन केले आहे. जिल्हा काँग्रेसचे बॉस मुकुल वासनिक, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे खेडेकरांच्या उमेदवारी अर्ज भरतेवेळी उपस्थित राहणार असून त्याआधी होणाऱ्या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
Advt
Advt
Advt. 👆
जिजामाता प्रेक्षागार मैदानाच्या शेजारील टिळक नाट्य क्रीडा मंडळाच्या मैदानात यावेळी जाहीर सभा होणार आहे. सकाळी ११ वाजता ही सभा होणार असून त्यानंतर संगम चौक, बाजार गल्ली, कारंजा चौक मार्गाने भव्य रोड शोचे नियोजन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.जिल्ह्यात परिवर्तन घडवण्यासाठी नरेंद्र खेडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत, वसंतराव भोजने, प्रसेनजित पाटील, नरेश शेळके यांनी केले आहे.