उध्दव ठाकरेंना बुलडाण्याच्या तरुण शेतकऱ्याने लिहिले स्वतःच्या रक्ताने पत्र! बुलडाणा लोकसभेत रविकांत तुपकरांना साथ देण्याची मागणी; वाचा संपूर्ण पत्र..

 
Hdjdj
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २६ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना २८ मार्चला अधिसूचना प्रसिद्ध होणार असून ४ एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर २ एप्रिलला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. रविकांत तुपकर यांच्या निर्धार मेळाव्यांना जिल्हाभरात मोठा प्रतिसादही मिळत आहे. दरम्यान शेतकरी नेते तुपकर यांना बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत साथ द्यावी अशा आशयाचे पत्र बुलडाण्यातील शेतकरी तरुणाने उध्दव ठाकरे यांना लिहिले आहे. आशिष गजानन जवंजाळ असे तरुणाचे नाव आहे. पोस्टाने हे पत्र उध्दव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यावर पाठवण्यात आले आहे.
  काय आहे पत्रात?
Tr
मा. उध्दवजी ठाकरे साहेब, जय महाराष्ट्र! साहेब तुम्ही कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून केलेले काम. तुमची शेत‌करी, कष्टकरी सामान्य जनतेविषयी असलेली भावना मुळे तुम्ही मला मला माझ्या कुटुंबातील वाटता. रक्ताने पत्र यासाठी लिहत आहे की सध्या लोकसभा निवडणूक आहे आणि शेतकरी संकटात आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या करत आहे. या संकटातून शेतकऱ्याना तुम्हीच बाहेर काढु शकता. त्यासाठी तुमचे हात बळकट करण्यासाठी शेतकरी कष्टकरी, जनतेची जाण असलेला तरुण कार्यकर्ता रविकांत तुपकर आहे. आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिल्यास बुलडाणा लोकसभा आपला विजय निश्चित आहे, ही माझ्यासारख्या असंख्य लोकांची भावना आहे . तरी बुलढाणा लोकसभेत रविकांत तुपकरांना साथ दयावी ही विनंती.आपला
आशिष गजानन जवंजाळ बुलडाणा