ना.प्रतापराव जाधवांचे जिल्ह्यात दमदार स्वागत! संतनगरी शेगावात जमले हजारो कार्यकर्ते; ना.जाधव म्हणाले, मंत्रीपद म्हणजे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी बुलडाणा लोकसभेतील मतदारांचा केलेला सन्मान...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे आज १३ जूनच्या सकाळी बुलडाणा जिल्ह्यात आगमन झाले. सकाळी साडेपाच वाजता ना.जाधव शेगाव रेल्वेस्थानकावर पोहचले. त्याआधी हजारो शिवसैनिक रेल्वेस्थानकावर ना.जाधव यांच्या स्वागतासाठी हजर होते. कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणांनी यावेळी रेल्वेस्थानक परिसर दणाणून गेला होता.
 तीन वेळा आमदार आणि चौथ्यांदा खासदार करून सेवेची संधी दिल्याबद्दल ना.जाधव यांनी जिल्ह्यातील मतदारांचे आभार मानले. आपलल्या मिळालेले मंत्रीपद म्हणजे नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील मतदारांचा केलेला सन्मान आहे. हे मंत्रीपद जनतेच्या सेवेसाठी आहे असे ना.जाधव यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले.