"बुलडाणा लाइव्ह" चा एक मॅसेज अन् पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले हजारो हात! गावागावात सुरू झाले संकलन; किराणा, अन्नधान्याची मदत तुम्हीही करू शकता!

जळगाव जामोद संग्रामपूर आणि शेगाव तालुक्यांतील अतिवृष्टीने १ लाख हेक्टर पेक्षा अधिक जमीन खरडून गेली आहे. २०० पेक्षा अधिक गुरे दगावली आहेत, शासकीय आकडेवारीनुसार २२८६ नागरिक बेघर झालेत. अन्न धान्य, कपडे, स्वयंपाकाचे साहित्य सर्वच काही वाहून गेलं आहे. सरकार सरकारच्या पद्धतीने मदत करेल पण आपल्या बांधवांच्या संकटात आपण धावून जाणे ही आपलीही जबाबदारी आहेच. देणारे हात खूप आहेत मात्र ती मदत संकलीत करून गरजुंपर्यंत पोहचवण्यासाठी "बुलडाणा लाइव्ह" ने एक व्यवस्था उभी केली आहेत. आपण आपापल्या पातळीवर एकत्रित केलेली मदत त्या त्या भागातील बुलडाणा लाइव्ह चे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडे सुपूर्द करता येईल.
आता कपडे नको, अन्न धान्य, किराणा साहित्य हवे..
बुलडाणा लाइव्हने केलेल्या आवाहनाला जिल्हाभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. उत्तम दर्जाच्या साड्या, लहान मुलांचे कपडे, पुरुषांचे कपडे जमा झाले आहे. कपड्यांचा पुरेसा साठा झाल्यामुळे आता त्याऐवजी अन्न धान्य, किराणा या स्वरूपातील मदत करण्याचा आग्रह बुलडाणा लाइव्ह करीत आहे. खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून आपल्याला सेवा कार्यात सहभागी होता येईल..
बुलडाणा -पत्रकार भवन बस स्थानकाजवळ,
राहुल रिंढे:8411027002
कृष्णा सपकाळ:8766847625
चिखली: गणेश धुंदाळे 7769070171 (राजमार्ग प्रमोशन कार्यालय, दैनिक विदर्भ दर्पण जवळ)अनंता काशीकर 9172072321
पवन शिराळे: 9763747142 (शिराळे ट्रेडर्स, बाजार समिती,चिखली)
देऊळगाव राजा:सूरज हनुमंते 8087775090,राजेश कोल्हे 777599811
सिंदखेड राजा: बाळासाहेब भोसले: 9657397833
लोणार: प्रेम सिंगी - 9960025184
सचिन गोलेच्छा - 8055219099
मेहकर, जानेफळ: अनिल मंजुळकर - 8698252907
खामगाव: भागवत राऊत: 9975493015
शेगाव: ज्ञानेश्वर ताकोते 7066432459
देऊळगाव मही: सचिन नागरे - 7350055188
मोताळा: संजय गरूडे- 7350133376
बिबी: ऋषी दंदाले - 7875592492
मलकापूर पांग्रा: अमोल साळवे - 8104286691
किनगाव राजा: निलेश डीघोळे - 9922238989
जलंब : संतोष देठे - 8975624725
देऊळगाव घुबे - ऋषी भोपळे 7083764922