Amazon Ad

आ. गायकवाड ठरले 'रोडकरी' ! विविध गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे होणार कॉंक्रिटीकरण ; ५३ कोटी १३ लक्ष मंजूर ..

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील विविध गावांमध्ये जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी ५३ कोटी १३ लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेद्वारे हा निधी मंजूर झाला असून यासाठी आ. संजय गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून हे शक्य झाले.
   बुलडाणा तालुक्यातील विविध गावांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली होती. आ.गायकवाड हे सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगून काम करत आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या पुनर्जीवनासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अधिवेशनात देखील यासंदर्भात आवाज उठविला होता. बुलडाणा शहरातील रस्त्यांच्या कायापालट झाला असून बुलडाणा विधानसभा मतदार संघातील संपूर्ण रस्ते दर्जेदार आणि गुळगुळीत करण्याचे काम सुरू आहे. अश्या प्रकारे आ. संजय गायकवाड यांनी रस्ते विकासासाठी विशेष प्रयत्न घेतले. यामुळेच आ. गायकवाड हे खऱ्या अर्थाने रोडकरी ठरले आहे.मुख्यमंत्री सडक योजनेतून ग्रामीण भागाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम होत आहे. ४० किलोमीटर अंतराचे हे काम होणार आहे. यामध्ये एकूण ११ रस्त्यांची कामे होणार आहे.
ग्रामस्थांचा प्रवास होणार सुकर! 
बुलडाणा तालुक्यातील गुम्मी ते जनुना (६ की.मी), राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ ई ते दहिद बुद्रुक ३ किमी, मोताळा तालुक्यातील खुपगाव ते किन्होळा, किन्होळा ते ब्राह्मदा, पानेरा ते खांडवा, पोखरी ते रिधोराखंडोपंत , सारोळा पीर ते चावर्धा, सारोळा पीर ते सारोळा मारोती, राष्ट्रीय महामार्ग ७५३ए ते खेरखेड, ते तालखेड , सावळा, अशा एकूण ४० किमी अंतराच्या मार्गाचे काम होणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होण्यापासून वाचवले जाणार आहे. कित्येक ग्रामस्थांचा प्रवास यामुळे सुकर होणार आहे.