चिखलीत वंचितचा फ्लॉप शो! बाळासाहेब आंबेडकरांची सभा पण गर्दी जमवण्यात अपयश! प्रचाराचा ताळमेळही हुकला; वसंतराव मगर प्रचारात का पडले मागे....?

 
Gghj
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याची राजकीय राजधानी समजणाऱ्या चिखलीत आज,१९ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड.बाळासाहेब आंबेडकर यांची सभा झाली. बुलडाणा लोकसभेचे वंचितचे उमेदवार वसंतराव मगर यांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली. "देश असुरक्षित हातात आहे, संविधान धोक्यात आहे" असे प्रतिपादन या सभेत बाळासाहेब आंबेडकरांनी केले. मगर यांना निवडणूक देण्याचे आवाहन केले.मात्र या सभेत नियोजनाचा चांगलाच अभाव दिसला. बाळासाहेब आंबेडकरांची सभा असूनही अपेक्षित गर्दी जमवण्यात वसंतराव मगर कमी पडले. जी थोडीफार गर्दी होती त्यातही उत्साह दिसला नाही. ज्या राजा टॉवर परिसरात ही सभा झाली त्या ऐतिहासिक स्थळाने एवढी फ्लॉप सभा आतापर्यंत पाहिली नाही अशी चर्चा सभा आटोपल्यानंतर परिसरात सुरू होती.
बुलडाणा लोकसभेची निवडणूक आता रंगतदार वळणार येऊन पोहचली आहे. वचिंतकडे सक्षम पर्याय असताना देखील वंचितने चर्चेत नसलेल्या वसंतराव मगर यांना उमेदवारी दिली. याआधी मगर यांनी ३ वेळा सिंदखेडराजा विधानसभा निवडणूक लढवली, तीनदा लाजिरवाण्या पराभवाची चव चाखल्यानंतर आता ते लोकसभेच्या रिंगणात आहेत. मात्र प्रचारात ते फारसे आघाडीवर दिसत नाही, वंचितचा एक सक्रिय गट मगर यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हापासूनच नाराज आहे. शिवाय वंचितचा उमेदवार हा जिंकण्यासाठी नव्हे तर मते खाण्यासाठीच उभा असल्याची चर्चा जनमाणसात पसरत असल्याने मुख्य स्पर्धेतून वसंतराव मगर चांगलेच मागे फेकल्या गेले आहेत. २०१९ ला वंचितचे बळीराम सिरस्कार १ लाख ७२ हजार ६३७ मते घेऊन डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या पराभवास कारणीभूत ठरले होते, हा इतिहास मतदारांच्या पक्का लक्षात असल्याने यावेळी मगर यांच्या बाजूने मतदारांचा कल दिसत नाही. त्यातच आज बाळासाहेब आंबेडकर यांची सभा असूनदेखील मगर यांना गर्दी जमवता आली नाही. सभेला गर्दी नसल्याने बाळासाहेब आंबेडकर देखील नाराज झाल्याची चर्चा आहे, एकंदरीत वसंतराव मगर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेचा पचकाच झाला...