परिवर्तनाचा हुंकार संतनगरीतून! संदीप शेळकेंची परिवर्तन रथयात्रा आज शेगावात! चौकाचौकात करणार शक्तिप्रदर्शन

 
 बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): अल्पकाळातच जिल्ह्याचे 'उद्याचे नेतृत्व' ठरलेले वन बुलढाणा मिशन चे संस्थापक संदीप शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेली परिवर्तन रथयात्रा आज शेगावात दाखल झाली. राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणारी आणि प्रचंड गाजलेली ही रथयात्रा आज गुरुवारी( दि 15) शेगाव शहरातील चौकाचौकात शक्तिप्रदर्शन करणार आहे.
दुपारी संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन शहरात यात्रा मार्गस्थ होणार आहे. तुम्ही बदल घडवा, मी जिल्हा घडवितो असा संदेश देत यात्रा निघालेली आहे.१० फेब्रुवारीला मोताळा तालुक्यातील नळकुंड या आदिवासी बहुल गावातून यात्रेचा प्रारंभ झाला. पहिल्याच। सभेत बोलताना या युवा नेत्याने जिल्ह्याच्या विकासाची तळमळ, व्हिजन व आक्रमकता याचे दर्शन घडविले. यामुळे शुभारंभ एकदम दणकेबाज झाला. आपल्या विकासाच्या संकल्पना मांडल्यावर त्यांनी जिल्ह्यातील नेत्यांच्या दादागिरीचे जाहीर पोस्टमार्टेम' केले! मला जिल्ह्यातून गुंडाराज व कमिशनराज तडीपार करायचे असून त्यासाठी जनता जनार्दन व मतदारांची समर्थ साथ हवी असे आवाहन करीत त्यांनी नळकुंडच नव्हे जिल्ह्याच दणाणून सोडला!
या चौकात शक्तिप्रदर्शन! 
पुतळा चौक, गणेश नगर, गांधी चौक, शिवनेरी चौक, वाटिका ऑफिस याभागात संदीप शेळके यात्रेच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधतील.