काँग्रेसच्या स्थापनादिनीच करेक्ट कार्यक्रम! चिखली मतदारसंघात काँग्रेसला पडले मोठे भगदाड; काँग्रेसच्या आजी - माजी पदाधिकाऱ्यांनी मुंबईत घेतला भाजपात प्रवेश;
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी केले स्वागत! बावनकूळे म्हणाले, श्वेताताईंच्या कार्याचा झपाटा पाहून वाटत नाही की त्यांची आमदारकीची पहिली टर्म असेल....
Dec 28, 2023, 20:04 IST
मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): चिखली तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांसह काँग्रेसच्या अनेक आजी - माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे येथे काँग्रेसला मोठे भगदाड पडले आहे. दि २९ डिसेंबर रोजी मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आजच्या या पक्षप्रवेशानंतर चिखली मतदारसंघात ग्रामीण भागामध्ये भाजपमध्ये होणाऱ्या इनकमिंगला येणाऱ्या काळात आणखी गती मिळणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.
मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, खा. सुनील मेढे ( भंडारा ) व आ. श्वेताताई महाले या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात आ. महाले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लक्ष्मणराव अंभोरे माजी सभापती पंचायत समिती, चिखली, राजू पाटील माजी सदस्य प. स चिखली, सरपंच भोगावती, संचालक कृ. उ. बाजार समीती, गजानन अंभोरे सरपंच, एकलारा, बाबुराव देशमुख, सरपंच सातगाव भुसारी, संतोष पाटील (दांदडे) उदयनगर, प्रकाश लोखंडे, माजी सरपंच पळसखेड लोखंडे, विलास तायडे, ग्रा.प. सदस्य सोनेवाडी, ज्ञानेशव अंभोरे, उपसरपंच एकलारा, नारायण झगरे, ग्रा.प.सदस्य एकलारा, विजय लंके, सदस्य ग्रा. प. एकलारा, प्रकाश डिगांबर अंभोरे, अध्यक्ष, तंटामुक्ती समीती एकलारा, रामदास अंभोरे, माजी ग्रा. पं. सदस्य एकलारा, प्रसाद गजानन अंभोरे, अनिल झगरे, पत्रकार, नारायण अंभोरे, सागर विजय लोखंडे, भोगावती, पाटीलबा पवार, माजी सरपंच एकलारा, योगेश गजानन भुसारी, भोगावती, सदाशिव डुकरे, भोगावती यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी अंकुश तायडे, माजी सभापती .प. स. चिखली, भारत सुरुशे, खरेदी विक्री संचालक तथा उदयनगर ग्रामसेवा सोसायटी, नितीन पाटील, सावरगाव डुकरे यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. श्वेताताई महाले यांचे कार्य लक्षवेधी - प्रदेशाध्यक्ष बावनकुळे
चिखली मतदारसंघात विकासाचे नवे पर्व सुरू करणाऱ्या व भाजपाला अधिकाधिक बळकटी देण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या आ. श्वेताताई महाले यांचे कार्य लक्षवेधी असल्याचे उद्गार प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी याप्रसंगी काढले. आ. महाले यांच्या कार्याचा झपाटा पाहून त्यांची ही आमदारकीची पहिली टर्म आहे यावर विश्वास बसत नाही असे ते म्हणाले. भाजपाचा पाया चिखली मतदारसंघात अधिक मजबूत करण्यासाठी पक्षाकडून त्यांना सर्वतोपरी सहकार्य व प्रोत्साहन मिळत असून स्थानिक पक्ष पदाधिकारी, नेते व कार्यकर्त्यांनी देखील आ. श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात चिखली मतदारसंघात येणाऱ्या काळात पक्षाला सर्वच निवडणुकांमध्ये यश कसे मिळेल यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन आ. बावनकुळे यांनी यावेळी बोलताना केले.