कुणाला मिळेल सरपंच पदाची खुर्ची? दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 2,56,790 जणांनी केले मतदान..!

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):खुर्ची काबीज करण्यासाठी राजकारणी जीवाचे रान करतात. साम-दाम-दंड-भेदचा अवलंब करीत,खुर्चीसाठी  वाट्टेल तेही करतात. मात्र मताधिक्य आवश्यक असते. आज सरपंच आणि सदस्य पदांच्या या खुर्चीसाठी सकाळी साडेसात ते दुपारी 3.30 पर्यंत सकाळी 7:30 पासून 3:30 पर्यंत  2 लाख  56 हजार 790 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला याची  68.11 टक्केवारी आहे.

 जिल्ह्यात 259 ग्रामपंचायतीत  251 सरपंच तर 1547 सदस्य उमेदवारांचे भवितव्य आज मशीन बंद झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 80 हजार मतदार मतदानासाठी सज्ज झाले होते. सकाळी साडेसात ते दुपारी 3.30 पर्यंत बुलडाणा जिल्ह्यात सरपंचपदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सकाळी 7:30 पासून 3:30 पर्यंत  2 लाख  56 हजार 790 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला याची  68.11 टक्केवारी आहे.मतदानाचा हा लोकोत्सव 843 केंद्रावर पार पडला. 20 डिसेंबरला मतमोजणी होणार असून 'खुर्ची कुणाची?' याचे उत्तर मिळणार आहे. गत एक महिन्यापासून जिल्ह्याला गावकी व भावकीच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर चढला होता. जिल्ह्यातील 279 ग्रामपंचायत पैकी प्रत्यक्षात 259 ग्रामपंचायत मध्ये रणसंग्राम रंगला होता. या 269 ग्रामपंचायत मध्ये 1,547 सदस्य पदांसाठी तर 251 सरपंच पदाच्या उमेदवारांसाठी  रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीत सदस्य पदांसाठी उभ्या असलेल्या 3 हजार 490 उमेदवार आणि सरपंच पदाच्या 851 उमेदवारांचे राजकीय भाग्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. सकाळी साडेसात वाजता पासून मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मतदारांचा उत्साह जाणवला. त्यानंतर मतदारांची गर्दी विरळ झाली होती. 

 मात्र दुपारी 4  वाजताच्या नंतर मतदारांची गर्दी वाढली होती. दरम्यान मतदानाच्या टक्केवारीतही वाढ होत गेली. रात्री उशिरापर्यंत फायनल मतदानाची टक्केवारी कळणार आहे. वृत्त हाती येईपर्यंत सकाळी 7:30 पासून 3:30 पर्यंत  2 लाख  56 हजार 790 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याची  68.11 टक्केवारी असल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली. उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद झाले असले तरी,20 डिसेंबर पर्यंत 'खुर्ची कुणाची' याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.