विजयराज शिंदेंच्या डोक्यात चाललय तरी काय? खासदारकीची फिल्डींग लावता काय? मंत्र्यांची साथ सोडेना..!!
जाहिरात
भाजप शिंदेसेनेचे पुन्हा फाटलेच तर भाजप येणाऱ्या विधानसभेसाठी योगेंद्र गोडेंना डावलणार नाहीच असे गृहीत धरून शिंदेंनी खासदारकीसाठी सेटिंग लावण्याचे काम सुरू केल्याची चर्चा आहे. तसेच भाजपने बुलडाणा लोकसभेवर भाजपचा उमेदवार निवडून आणण्याचा विडा उचललेला आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरील नेत्यांना जबाबदारी देखील वाटून देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव कालपासून लोकसभा प्रवास योजनेसाठी जिल्ह्यात आहेत. या संपूर्ण प्रवासात विजयराज शिंदे त्यांच्यासोबतच आहेत.
अशात अलीकडे विजयराज शिंदेच्या अनेक मुंबई वाऱ्या सुरू आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी जवळीक साधण्याचा सातत्याने त्यांचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांच्या ते भेटी घेत आहेत. जिल्ह्यातील इतर माजी आमदार आपापल्या मतदारसंघात लक्ष घालत असताना विजयराज शिंदे मात्र जिल्हाभर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यात लोकसभेचा विचार पक्का हाय असे राजकीय वर्तुळातील तज्ञांचे म्हणणे आहे, त्याचीच सेटिंग लावण्यासाठी हा खटाटोप असल्याचे कळते.