बुलढाण्यात मतदान- आधार कार्ड जोडणी मोहीम वांध्यात! कामास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध फोजदारी कारवाई !!
ही मोहीम निवडणूक विभागाच्या मार्गदर्शनात १३ तहसील कार्यालयांनी हाती घेतली आहे. इतर तालुक्यांच्या तुलनेत बुलढाणा तालुका यात माघारल्याचे दिसून येते. बुलढाणा तालुक्यातील बूथ लेव्हल ऑफिसर यांच्या मार्फत हे काम करण्यात येत आहे. या मोहिमेची मुख्य जवाबदारी त्यांची आहे. या 'बीएलओ' मध्ये समाविष्ट असलेल्या काही अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी हे काम करण्यास नकार दिला. यामुळे तालुक्यातील ही मोहीम अडचणीत आली असून तहसीलदारानी अश्या अंगणवाडी व आशा सेविकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा याची कल्पना दिली.
ही मोहीम निवडणूक विषयक राष्ट्रीय कर्तव्य असल्याने त्याला नकार देणाऱ्या अश्या कर्मचाऱ्यांवर फोजदारी कारवाई करण्याची तयारी बुलढाणा तहसील कार्यालयाने चालविली आहे. यासंदर्भात विचारणा केली असता तहसीलदार रूपेश खंडारे यांनी याला दुजोरा दिला. ज्या सेविका आज मंगळवारोपर्यंत संमती पत्र देणार नाही त्यांच्याविरुद्ध फोजदारी कारवाई करण्यात येईल असे खंडारे यांनी सांगितले.
काय आहे आकडेवारी..?
जिल्ह्यातील ७ पैकी बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील जोडणीचे काम सर्वात कमी म्हणजे केवळ ८.७८ टक्के इतकेच झाले आहे. आज अखेर २ लाख, ९२ हजार २६३ पैकी केवळ २५ हजार ६४९ मतदाराचीच जोडणी झाली आहे.