अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघही धिरज लिंगाडेंच्या पाठीशी!

 
dhiraj
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ३० जानेवारीला होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या अमरावती विभागीय मतदारसंघाच्या  निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असलेले धिरज लिंगाडे यांना मिळणारा पाठींबा वाढत आहे. याआधीच महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, भारतीय शेतकरी कामगार पक्षाने लिंगाडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघानेही पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत लिंगाडे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने  लिंगाडे यांना पाठींबा देत असल्याचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व धिरज लिंगाडे यांना पाठवले आहे.

 गत १२ वर्षांत विधिमंडळात पदवीधरांचे प्रश्न मांडल्या गेले नाहीत. वाढती बेरोजगारी, नोकर भरतीमध्ये होणारे घोळ, जुनी पेन्शन योजना अशा विविध प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठवण्यासाठी पदवीधरांच्या विविध संघटना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार लिंगाडे यांना पाठिंबा देत आहेत.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघानेही धीरज लिंगाडे यांना पाठीब्यांचे पत्र दिले असून विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या अमरावती विभागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धिरज लिंगाडे यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. पाठिंब्याच्या पत्रावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्रावण बरडे आणि सरकार्यवाह सुधाकर अडबाले यांच्या  स्वाक्षऱ्या आहेत.