भाजपच्या प्लॅनिंगसाठी आलेल्या केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवांची खा. प्रतापराव जाधवांनी घेतली भेट..! काय झाली असेल चर्चा..?

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्याचा पुढचा खासदार भाजपचाच अशी घोषणा करून भाजप कार्यकर्ते जोमाने तयारीला लागलेत. त्याच नियोजनाचा एक भाग म्हणून केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव बुलडाणा लोकसभा क्षेत्रात प्रवास करण्यासाठी आज पासून जिल्ह्यात आहेत. दरम्यान भाजपची रणनीती ठरवण्यासाठी आलेल्या केंद्रीय मंत्र्यांची शिंदेसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आज खामगावात भेट घेतली. 

hjh

 यावेळी खासदार जाधव आणि केंद्रीय मंत्र्यांत लोकसभा जागेसंदर्भात नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील समोर येऊ शकला नाही. मात्र भाजपा - शिवसेनेच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याचे कळते. विशेष म्हणजे कालच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील खा. जाधवांच्या मेहकर येथील निवासस्थानी भेट दिली होती. दोन दिवसांत दोन जबाबदार केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन आमचा मतदारसंघ आमच्याकडेच राहू द्या असे तर खा.जाधव म्हणत नसतील ना अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.